आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:वाकडी येथील डॉ. वामनराव साळवे यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

वाकडी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील डॉ.वामनराव निंबाजी साळवे यांना शिक्षक विकास परिषद, गोवा संस्थेचे वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे संपन्न झालेल्या २६ व्या राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशनात “प्राइड ऑफ नेशन” या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. शिक्षक विकास परिषद गोवा या संस्थेचे वतीने बेळगाव (कर्नाटक) येथील लोकमान्य भवनात २६ वे राष्ट्रीय शैक्षणिक अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात ‘शैक्षणिक धोरण आणि सद्यस्थिती’ या विषयावर चर्चा करण्यात आली.

त्याशिवाय विविध राज्यातील निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना राष्ट्रीय व राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक अरविंद दिक्षित ( सेवानिवृत्त) यांचे हस्ते डॉ.वामनराव साळवे यांना शाल श्रीफळ प्रमाणपत्र संस्थेचे पुरस्कार गौरव चिन्ह, आदी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी रमेश कुळकर्णी, पुष्पा गायतोंडे, मारूती कुंभार, सतीश वेळीप, सुरज नाईक, ॲलन बोर्जीस, तुकाराम शेटगांवकर, भारत बेतकेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.साळवे हे शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य असून सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत.

बातम्या आणखी आहेत...