आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत, नेतृत्व करताना समज देऊन युवकांचा नेतृत्व विकास, नवलेखकांना प्रोत्साहन देऊन लिहिते करणारे संशोधक, समिक्षक, जालना येथील मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या स्मृतींना जालना जिल्ह्यातील साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उजाळा दिला.
प्रा. हरकिशन मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेस प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल, प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, प्रा. बसवराज कोरे, प्रा. डाॅ. नारायण बोराडे, राम गायकवाड, डॉ. संजीवनी तडेगावकर, कवयित्री रत्नमाला मोहिते, प्रा. पंढरीनाथ सारके, डॉ. यशवंत सोनुने, प्रा. राम कदम, प्रा. उन्मेश मुंढे, सुधीर जाधव, डॉ. एकनाथ शिंदे, पंडितराव तडेगावकर आदींची उपस्थिती होती. कथाकार प्रा. बसवराज कोरे यांनी विद्यापीठात शिकत असतांना कोतापल्ले यांनी माझ्या सह असंख्य विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. राम गायकवाड म्हणाले, विद्यापीठात मी विद्यार्थी नेतृत्व करताना वेळप्रसंगी माझ्या सारख्या ला चार गोष्टी समज स्वरूपात हक्काने सांगितल्या, आपण ही त्या आदराने स्वीकारल्याचे सांगितले. डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी कुलगुरु असताना एका कार्यक्रमात पहिली भेट झाली.
माझे पहिले पुस्तक वाचून त्यांनी सविस्तर विचारपूस केल्याने मला आनंद वाटला, नव लेखकाची ही विचारपूस कायमची स्मरणात राहिली.पुढे आशयघन नियतकालिक संपादनासाठी महत्वपूर्ण मदत झाली. असे नमूद केले. प्रा. नारायण बोराडे म्हणाले, पुरस्कारासाठी स्वतः अर्ज न करणे हे माझे तत्व होते पण डॉ. कोतापल्ले कुलगुरू असताना आदर्श शिक्षकासाठी नारायण तुझी निवड विद्यापीठाने तुझे काम बघून केली तू अर्ज न करण्याचा हट्ट सोडला पाहिजे असे कौटुंबिकतेने सांगितले व मी त्यांचे ऐकले. प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल यांनी जे. ई. एस. मध्ये युवक महोत्सव प्रसंगी महाविद्यालयात सुरक्षितता नसते, अगाऊ प्रसंग उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यापीठाचा युवक महोत्सव विद्यापीठात घेतला पाहिजे, अशी मागणी केली होती.
पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणी झाली. ती आजपर्यंत सुरू असल्याचे स्पष्ट केले. प्रा. राम कदम म्हणाले, विद्यापीठात इंद्रजित भालेरावांच्या सोबतीने डॉ. कोतापल्ले यांच्या सानिध्यात आलो व वाचनामुळे लेखक झालो. प्रथम प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. प्रा. उन्मेश मुंढे यांनी पुण्यात वर्ग मित्राचा रस्त्यावर अपघात झाला, तेव्हा मित्राचे बील भरणारे शिक्षक डॉ. कोतापल्ले यांच्या रूपाने अनुभवले,असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्रा. हरकिशन मुंदडा यांनी वयाने छोट्या मित्राच्या श्रध्दांजली सभेस उपस्थित राहणे क्लेशदायक असते ते आपण आज अनुभव़तोय, एक नैतिकतेचे अंतर ठेवून आम्ही शेवटपर्यंत निखळ मैत्री जपली. माझा मित्र फार मोठा होता याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शोक सभेचे सूत्रसंचालन पंडितराव तडेगावकर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.