आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार प्रकल्पाची पाहणी:डॉ. फड यांनी महिला बचत गटांच्या कामांची केली पाहणी

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानव विकास आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या अनुदानाच्या साहाय्याच्या आधारे उभारण्यात आलेल्या रोजगार प्रकल्पाची पाहणी करून परतूर तालुक्यातील कामे चांगली असल्याचे मत मानव विकास आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.

मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत परतूर व परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथे चालू असलेल्या निंबोळी खत निर्मिती प्रकल्प, तेजस्वीनी रुरल मार्ट, दुर्गामाता बचत गटातर्फेच्या धान्य साफसफाईचे काम तसेच शालेय मुलींसाठी चालू असलेल्या बस सेवेच्या कामाची पहाणी केली. मानव विकास तर्फे मिळणा-या अनुदाना आधारे माविम चांगल्याप्रकारे रोजगार निर्मिती उपक्रम राबवित आहे असेही फड म्हणाले. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना फड यांनी आपला रोजगार कसा वाढेल, स्थानिक कच्चा माल जास्तीत जास्त कसा उपयोगात येऊ शकेल याच बरोबर निर्माण होणा-या रोजगाराचा योग्य तो विनियोग कसा होईल याकडे लक्ष देण्याबाबत सांगीतले.

अंतर्गत समन्वय राखणे, एकमेकांचा आदर करणे, अडीअडचणी समजून घेणे, विचाराचे आदान प्रदान करणे, कोणाचाही अवमान न करणे या बाबी विकासासाठी किती आवश्यक आहेत हे त्यांनी सोदाहरण पटवून दाखवले. आजची परिस्थिती उदया बदलत जाणारी असते, त्यामुळे एखादे संकट आले, अडचण आली तर लगेच खचून जाऊ नये, शांत चित्ताने, आत्मविश्वसाने त्यावर तोडगा काढावा असेही ते म्हणाले. जास्तीत जास्त महिलांनी निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या अनुषंगाने आपला अनुभव सांगावा, मत व्यक्त करावे असे फड यांनी सांगितल्याने अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपसंचालक म‍च्छिंद्र भांगे, विनोद कुलकर्णी, उमेश कहाते, वैभव कुलकर्णी, सतिश भांडे, शैलेश उखळकर, अर्जुन लाये, मंगला साकळकर यांच्यासह परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...