आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय युपीएससी समिती सदस्यपदी विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयातील प्रा.डॉ. राजेंद्र मोरे यांना राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुलगुरू राजशेखरन पिलई, कौशल्य विकास चे केंद्रीय सचिव प्रफुल्ल पाठक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लेफ्टनंट जनरल जब्बीर सिंग, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, प्राचार्य प्रवर्तक डॉ. प्रज्ञा प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
करिअर कट्टा या उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा के. जे. सोमय्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विद्याविहार मुंबई येथे पार पडला. डॉ. राजेंद्र मोरे राज्यशास्त्र विषयातील अभ्यासक असून स्पर्धा परीक्षेचे तज्ज्ञ फॅकल्टी म्हणून त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहेत. त्यांच्या या पुरस्काराबद्दल माजी आमदार शिवाजी चोथे, डॉ. संभाजी चोथे, विनायक चोथे, प्राचार्य डॉ. आर. के. परदेशी, प्रा. प्रमोद जायभाये, डॉ. राजेंद्र उडान, डॉ. राजेश लहाने, किरण पाटील यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.