आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:तोतया डॉ. सुळसुळे ताब्यात; चार दिवस कोठडी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील अंतरवाला येथे क्लिनिक थाटून रुग्ण तपासणी करणाऱ्या तोतया डॉ. रामेश्वर सुळसुळे याला तालुका जालना पोलिसांनी शहरातून बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी शीतल सोनी यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. परंतु, तोतया डॉ. रामेश्वर सुळसुळे हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. अखेर तालुका जालना पोलिसांनी काल सायंकाळी त्याला जालना येथून अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...