आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड:डॉ. हेडगेवार जयंतीनिमित्त मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड येथील कै. दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक विष्णू सोनवणे, सर्व शिक्षक बांधवांनी हेडगेवार यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

उन्हाच्या तीव्र झळा व उष्माघात लक्षात घेता मुक्या जनावरांसाठी व पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून पर्यावरण संतुलित ठेवावे या विचाराने दत्ताजी भाले विद्यालयाने मुक्या जनावरांसाठी पाणपोईची व्यवस्था केली. पाण्याची व्यवस्था करताच तहानलेल्या गोमाता पाणी पिण्यासाठी येऊ लागल्या. याप्रसंगी गोमातांना पोळीचा नैवेद्य देण्यात आला. तसेच शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठीही पाणपोईची सोय केली. मोठ्या रांजणाची व्यवस्था करून या रांजणामध्ये फिल्टरचे पाणी टाकून सुगंधी मातीतील शीतल पाणी सर्वांना पिता यावे अशी व्यवस्था करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक विष्णू सोनवणे, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...