आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:बदनापुरात दृष्टिदान यज्ञ चालूच राहणार

बदनापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील प्रत्येक गावातील मोतीबिंदूचा शेवटचा रुग्ण असेपर्यंत आपण गावा-गावात नेत्र शिबिरे व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार असून हा दृष्टिदान यज्ञ चालूच राहणार असल्याचे प्रतिपादन डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी केले.

भाकरवाडी येथे सुरू असलेल्या नेत्र तपासणी शिबिरात बोलत ते होते. बदनापूर तालुक्यातील प्रत्येक गावात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्यावतीने करण्यात येते. येथे मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांवर चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात तसेच त्यांच्या जाण्या-येण्याचा व राहण्या- खाण्याचा सर्व खर्च पाथ्रीकर यांच्यातर्फे उचलण्यात येतो.

बदनापूर तालुक्यात आतापर्यंत विविध गावांत नेत्र तपासणी शिबिरात ६००० रूग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले तर अत्यल्प किमतीत चष्म्यांचे वाटप करण्यात आलेले. आहे. तर २५१ रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. या वेळी सरपंच सिध्दू तिडके, डॉ. पटेल, नामदेव तिडके, राजू तिडके, शिवाजी तिडके आदींची उपस्थिती होती. भाकरवाडीत १३७ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली. यावेळी १७ मोतीबिंदू असणारे रुग्णांचे निदान करण्यात आले असून त्यांच्यावर २७ जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांच्यासाठी वाहन व्यवस्थाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.