आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय सर्वेक्षण विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावांच्या सर्वेक्षणासंबंधी ‘स्वामित्व योजना’ राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून ड्रोनच्या सहाय्याने गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. शनिवारी परतूर तालुक्यातील आंबा येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्वे ऑफ इंडियाचे अधिकारी भगवान प्रसाद, भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक सी. ए. सेवक, पं.स.सदस्य दिगंबर मुजमुले, प्रशांत बोनगे आदींची उपस्थिती होती.
गावातील मालमत्ताचे अचूक पद्धतीने सर्वेक्षण करून मालमत्ता धारकांना पी.आर.कार्ड देण्याची प्रक्रिया या योजनेत राबविली जाणार आहे. गेली अनेक वर्षांपासून गावांचे सर्व्हेक्षण रखडल्याने मोठी शहरे वगळता, छोट्या गावातील नागरिकांना पी.आर.देता येत नव्हते. अनेक खरेदी- विक्री अथवा कर्ज प्रकरणे पी.आर.नसल्याने प्रलंबित होती. स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीतुन नागरिकांच्या या अडचणी दूर होणार आहेत. परतूर तालुक्यातील ९८ गावे आणि मंठा तालुक्यातील ११३ गावे आहे एकूण २०१ गावांमध्ये टप्प्याटप्प्याने हे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वे ऑफ इंडिया, भूमिअभिलेख विभाग आणि ग्राम विकास विभागाचे कर्मचारी मिळून संयुक्तरित्या हे सर्वेक्षण करणार आहेत.
यावेळी आमदार बबनराव लोणीकर म्हणाले, गाव खेड्यात होणाऱ्या वादात बहुतांश वाद जमिनीशी संबंधित असतात. या योजनेच्या माध्यमातून अचूक मोजमाप होऊन लाभार्थीला पी.आर. मिळणार असल्याने बहुतांश भांडण-तंट्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूमीअभिलेख विभागाचे एल. बी. गिरी, डी. जे. शिंदे, रमेश चिटकलवार, प्रवीण शहाडकर, पंकज मोकासे, तुकाराम ऊबाळे, सतीश मेहेत्रे, भागवत सुरुंग, आदिलखान, गजानन बनगर, सोनी कंदारे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.