आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:कौटुंबिक वादातून न्यायालयाच्या आवारातच दोन गटांत हाणामारी

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयात सुरू असलेल्या कौटुंबिक खटल्याच्या तारखेसाठी आलेल्या दोन गटांत फ्री स्टाईल राडा झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास परतूर न्यायालयाच्या आवारात घडली आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून दोन्ही गटांतील ११ जणांवर गुन्हा दाखल झाला.अजितसिंग करतारसिंग चव्हाण (रा. नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही दिवसांपासून त्यांचा कौटुंबिक वाद परतूर न्यायालयात सुरू आहे.

या वादाच्या तारखेसाठी परतूर न्यायालयाच्या परिसरात आले असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास पत्नीने तुम्ही मला कपडेलत्ते, भांडे व इतर सामान दिले नाही म्हणून कोर्टाच्या आवारातच गोंधळ घालण्यास सुरूवात केली. या वेळी सासर कडील मंडळी विजय राठोड, गणपती आढे, नकुल विजय राठोड, अजय भगवान राठोड,लक्ष्मी विजय राठोड आणि एक महिला (रा. सर्व हास्तूर तांडा) यांनी आमच्या मुलीला नांदवले नाही असे म्हणत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

विजय पांडुरंग राठोड (रा. हास्तूर ताडा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलीची परतूर कोर्टात पोटगीची केस सुरू असल्याने आम्ही तारखेवर हजर झालो होते. परंतु काही कारणास्तव तारीख झाली नाही. दुपारी २ वाजेच्या घरी जाण्यासाठी कोर्टातून निघालो असता कोर्टाच्या बाहेर माझी मुलगी उभी असताना अजितसिंग करतारसिंग चव्हाण, राजसिंग करतालिंग चव्हाण (रा.नांदेड) हे माझ्या मुलीला पाहताच पळत आले. मुलीला व मला चापट बुक्याने मारहाण केली.

हिने तारीख वाढवून घेतली, आता हिचा काटाच काढू म्हणत करतासरिंग चव्हाण हातात तलवार घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आला. याचवेळी बबन राठोड, उषा बबन राठोड, नंदुबाई करतारसिंग चव्हाण यांनी माझ्या मुलीचे डोक्याचे केस धरून ओढले व चापट बुक्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी.

परस्पर तक्रारीवरून ११ जणांवर गुन्हा दाखल
न्यायालयाच्या आवारातच दोन गटांत फ्रीस्टाइल झाली. या प्रकरणी दोन्ही गटांच्या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक रामदास फुपाटे व इस्माईल शेख हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...