आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी ‎:निधीअभावी शिक्षकांचे‎ वेतन पुन्हा रखडणार‎

जालना‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिसेंबर महिन्याच्या वेतनाकरिता‎ निधी अपुरा आल्याने प्राथमिक ‎शिक्षकांचे वेतन रखडले जाऊ‎ शकते. त्यामुळे राज्य सरकारने ‎यामध्ये लक्ष घालून राज्यातील‎ जि.प. प्राथमिक शिक्षकांची तीन ‎ महिन्यांपासून सातत्याने होणारी ‎ आर्थिक विवंचना थांबवून‎ तात्काळ निधी देऊन वेतन प्रकरणे ‎ निकाली काढावीत, अशी मागणी ‎ ‎ संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष‎ राजगुरू, सचिव अमोल तोंडे,‎ कार्याध्यक्ष बी. आर. काळे, योगेश‎ झांबरे यांनी केली आहे.

दरम्यान,‎ यामुळे शिक्षकांना महिन्याच्या एका‎ तारखेला वेतन देण्याच्या घोषणेचा‎ या माध्यमातून फज्जा उडाला‎ आहे.‎ महाराष्ट्र राज्यातील जिल्हा‎ परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन हे‎ दरमहा १ तारखेला करण्याबाबत‎ शासन निर्देश दिले होते.‎

दिरंगाईकडे लक्ष द्यावे‎
शिक्षकांच्या वेतनास होणारी‎ दिरंगाई याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे,‎ अशी मागणी प्रहार शिक्षक व‎ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने‎ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,‎ शिक्षणमंत्री यांच्यासह सचिव व‎ संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे‎ केली आहे.‎ -संतोष राजगुरू अध्यक्ष, प्रहार‎

बातम्या आणखी आहेत...