आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा पडतोय भुर्दंड

पिंपळगाव रेणुकाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा पावसाने विलंब केला असला तरी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करीत खरिपातील पेरणी पूर्ण केली.पेरणीनंतर पाऊस देखील काही भागात मेहरबान असल्यामुळे पिके देखील जोमात आहे.माञ सोयाबीन पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने ही अळी संपूर्ण झाडच उध्वस्त करीत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. त्यामुळे शेतकरी या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी विविध औषधी फवारणी करीत असल्याचे चिञ सध्या शेत शिवारात दिसत आहे. दरम्यान पिकावर तणनाशक व ईतर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. तालुक्यात यंदा सुरूवातीपासुन दमदार पावसाची प्रतिक्षा असली तरी शेतकऱ्यांनी समाधानकारक पावसावर जवळजवळ एक लाख नऊ हजार हेक्टरवर कपाशी, सोयाबीन, मका, उडीद, मुग, तुर, ज्वारी आदी पिकाची पेरणी केली आहे. शिवाय पेरणी नंतर काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहुन सततधार पावसाचा मोठा फटका खरिपातील पिंकाना बसला आहे. त्यामुळे यावर्षी खरिपातील पिके पाहीजे त्या प्रमाणात जमली नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सुर आहे. अशातच दुसरीकडे आता सोयाबीन पिकावर विविध रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी विविध कंपनीच्या महागडी औषधी फवारणी करीत आहे. यंदा सोयाबीन पिकाला सुरूवातीपासुनच ग्रहण लागले आहे.

काही शेतकऱ्यांची पेरणी केलेली सोयाबीन उगवली नाही. त्यात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तर सोयाबीन पिवळे पडले आहे. त्यात आणखी आता रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने सोयाबीन पिकाने यंदा शेतकऱ्यांची मोठेदुखी वाढवली आहे. यातच काही मंडळात सततधार पावसामुळे पिके पिवळी पडून पिंकाची वाढ खुटली आहे. त्यामुळे निश्चितच उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भरुन द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी ईमामेक्टीन बेंझाईंट हे पाच ग्रँम दहा लिटर पाण्यात फवारावे. त्याच्यासोबत डायथेन एम.४५ प्रतिपंप दहा गँम मिश्रण करुन फवारावे. असा सल्ला कृषि सहाय्यक नंदकीशोर पायघन यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...