आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड कामगार:मजुरांची वानवा : पत्नीने ओढले मोघे, पतीकडून पेरणी

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उसतोड कामगार स्थलांतरित झाल्याने ग्रामीण भागात कापूस वेचणीसह शेतीच्या कामांना मजूर मिळणे मुश्कील झाले असून सध्या शेतकरी रिकाम्या झालेल्या सोयाबीनच्या शेतात रब्बी पेरणीची लगबग सुरू अाहे. केज तालुक्यातील केकाणवाडी येथे मजूर न मिळाल्याने पेरणीसाठी शेतकरी पत्नीने मोघे ओढून पतीच्या मदतीने अर्धा एकरवर वाटाण्याची पेरणी केली.

तालुक्यातील शेतकरी धनंजय केकाण यांना अडीच एकर जमीन अाहे. त्यांनी खरीप हंगामात सोयाबीनचे पीक घेतले. सध्या हे शेत रिकामी झाल्यामुळे रब्बीची पेरणी सुरू आहे. त्यांच्याकडे सध्या एकच बैल असल्याने पेरणीसाठी दुसरा बैल कोठून आणावा हा प्रश्न होता. त्याचबरोबर ऊसतोड कामगार स्थलांतरीत झाल्याने मजुर मिळणे मुश्कील झाले. त्यामुळे केकान यांनी केकाणवाडी येथील अडीच एकर पैकी अर्धा एकरात गुरुवारी सकाळी रेघटनी केली.

नंतर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पत्नी आशाबाई यांनी मोग्याची ओढणी केली आणि धनंजय यांनी वाटण्याची पेरणी केली. मजुर मिळत नसल्यामुळे पेरणीचे काम करावे लागले असल्याचे केकान यांनी सांगीतले. सध्या या शेतकऱ्याची दोन मुलेही बाहेरगावी शिक्षण घेतात. त्यांनी परिस्थितीमुळे काही दिवस ऊस तोडणीचे काम केले. मात्र सध्या ऊस तोडणी होत नसल्यामुळे अडीच एकर शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहे.

अल्पभूधारकांची होतेय परवड
ग्रामीण भागात मजुरांचा प्रश्न अवघड झाला असून शेतीच्या कामासाठी मजूरच मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातही अल्पभूधारकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. वेळेवर पेरणी व्हावी यासाठी धडपड सुरू आहे. एकीकडे कापूस वेचणीसारखी रखडलेली कामे तर दुसरीकडे मजुराचा प्रश्न सतावत आहे.

बातम्या आणखी आहेत...