आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध‎:शेतमजूर अन् कामगारांचा दुरडी मोर्चा‎

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎रेशन वरील धान्य बंद करून‎ लाभार्थींच्या बँक खात्यावर ठराविक‎ रक्कम जमा करण्याचा निर्णय‎ शासनाच्या विचाराधीन‎ आहे.शासनाच्या या निर्णयाचा‎ फटका ग्रामीण भागातील‎ शेतमजूर,कामगार, गरीब जनता‎ यांना बसणार आहे. महागाईच्या या‎ युगात मजुरांना उपाशी ठेवण्याचे‎ काम सरकार करत असल्याचा‎ आरोप करत शेतमजूर युनियन लाल‎ बावटाच्या वतीने परतूर‎ तालुक्यातील बाबुलतारा येथे‎ गुरुवारी अन्न अधिकार दुरडी मोर्चा‎ काढण्यात आला. बाबूलतारा आणि‎ परिसरातील अनेक शेतमजूर,‎ कामगार महिला हातात दुरडी घेऊन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.‎

सुरुवातीच्या काळात‎ स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी‎ सरकारने बँक खात्यावर जमा केली.‎ आज ही सबसिडी बंद होऊन गॅसचे‎ दर दुपटीपेक्षा जास्त वाढले आहेत.‎ तशीच अवस्था रेशनच्या‎ सबसिडीची होणार असल्याचा‎ आरोप करत मोर्चात सहभागी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महिलांनी सरकारच्या या निर्णया‎ विरोधात जोरदार घोषणाबाजी‎ केली. रेशन धारक कुटुंबांना‎ खात्यावर अनुदान देण्याऐवजी‎ दरमहा ३५ किलो धान्य वाटप‎ करावे, पत्र्याचे शेड व पत्र्याचे घर‎ असणाऱ्या मजूर कुटुंबांना घरकुल‎ वाटप करावे आदी मागण्या या‎ मोर्चात करण्यात आल्या.‎

बातम्या आणखी आहेत...