आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा:उत्सवकाळात प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य अपेक्षित

मंठा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या देशभर गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु प्रत्येक सण -उत्सवाच्या काळात प्रशासनावर मोठी जबाबदारी असते. अशावेळी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

मंठा येथील जयभवानी गणेश मंडळाला भेट देण्यासाठी तसेच आरतीसाठी जिल्हाधिकारी डॉ.राठोड, पोलिस अधीक्षक डॉ. शिंदे मंठा येथे आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, सर्व समाजाने एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होऊन सामाजिक सलोखा निर्माण केला पाहिजे. मंठा येथे सर्व नागरिक एकत्र येऊन उत्सव साजरे करतात ही गौरवास्पद बाब आहे. याचा इतर मंडळांनीही आदर्श घेतला पाहिजे, असे सांगितले. प्रारंभी ए. जे. बोराडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी मंठा येथील गणेश उत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती देवून गणेशोत्सवात दरवर्षी कोणकोणते सामाजिक उपक्रम साजरे केले जातात हे सांगितले. या कार्यक्रमाला नगरपंचायतचे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांचा मंठा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्पू दायमा यांनी केले. यावेळी शहर व परिसरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...