आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरी:जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातून इंटरनेट मोडेम, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर पळवले

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य प्रशासकीय ईमारतीत घडला प्रकार

जालना येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तळ मजल्यावरील जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाच्या दोन खिडक्याचे गज तोडून चोरट्यांनी इंटरनेटचे मोडेम व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिकारी-कर्मचाऱ्याकडून प्राथमिक माहिती घेतली.

जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातील स्ट्रॉंगरूमला २४ तास पोलिस बंदोबस्त तैनात असताना ही चोरीची घटना घडली. यामुळे तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. यात चोरट्यांनी कार्यालयाच्या पश्चिमेकडील बाजूने येऊन दोन खिडक्याचे गज तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मोडेम व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर काढून पळ काढला. दरम्यान, कार्यालयाचा सर्व डाटा सेंट्रल सर्व्हरला जोडलेला असल्याने नियमित कामकाज सुरू राहील, असे प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी दीपक जयवळ यांनी सांगितले.