आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक बैठक:धावडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद ; अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

धावडा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत वडोद तांगडा केंद्रांतर्गातील शाळांची शैक्षणिक वर्ष २०२२ ची शिक्षण परिषद घेण्यात आली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी बी. एल. बडगे, केंद्रप्रमुख जे. वाए. सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी लोकमान्य टिळक, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भिमराव बडगे. जे. वाय. सय्यद, दशरथ बडगे, सपकाळे, विठ्ठल इंगळे, शशिकांत जवरे, किशोर धंदर यांनी शैक्षणिक विषय, विद्यार्थ्यांची होणारी अध्यायनस्तर निश्चितीबाबत मार्गदर्शन केले. या परिषदेला वडोद तांगडा केंद्रांतर्गातील जाळीचा देव, वाढोणा, प्रतापनगर, सुंदरवाडी, वालसावंगी, विझोरा, मेहगाव, समतानगर, धावडा, भोरखेडा, वडोदतांगडा, बंगसीवाडी, देवीचीवाडी, खडकवाडी, पोखरी या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते..

बातम्या आणखी आहेत...