आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना मार्गदर्शन:मेहगाव शिवारात ई- पीक पाहणी कार्यक्रम; गजानन इंगळे यांच्या शेतात महसूल विभागाचे प्रात्यक्षिक

धावडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील मेहगाव येथे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी संदीप लाड यांनी ई- पीक पाहणी करण्याचे प्रात्यक्षिक गजानन इंगळे यांच्या शेतात दाखवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.राज्य शासनाने ई-पीक पेऱ्याची नोंद करण्यासाठी मोबाईल अँप विकसित केले आहे. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत हे ॲप प्रत्यक्ष शेतकऱ्याने आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपल्या शेतात लागवड केलेले पिकाचा फोटो काढून त्याचीही पीक नोंदणी करून घ्यावी. पीक नोंदणी करताना काही चूक झाल्यास २४ तासांत दुरुस्ती करण्याची सुविधा अँपमध्ये आहे.

तलाठी संदीप लाड म्हणाले, शेतकऱ्यांना ही ई-पिक पाहणीची ऑनलाईन नोंद केल्यानंतरही स्वयं घोषणापत्र तलाठ्याकडे सादर करावे लागणार आहे. यानंतर तलाठी यातील दहा टक्के क्रॉस चेकिंग करणार आहे यानंतर अंतिम नोंद सातबाऱ्यावर घेतली जाणार आहे. पीक विमा विमा दावे नैसर्गिक आपत्ती काळात झालेल्या नुकसानीसाठी ही नोंद महत्त्वाची ठरणार आहे. ई -पीक पाहणी मध्ये नोद असेल तरच शासकीय नैसर्गिक आपत्तीची मदत मिळेल व पिक विमा मिळेल. यावेळी शंकर बलावणे, भगवान इंगळे, समाधान गव्हाणे, तापाबाई बलावणे, शारदाबाई गायकवाड, कविताबाई बैनाडे, संघर्ष गायकवाड, शेळके, गांधी राजपूत यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...