आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बंजारा समाजाच्या प्रश्नांबाबत खा. राहुल गांधी यांच्याशी चर्चा

मंठा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंजारा समाजाच्या शिक्षण,आरोग्य आणि रोजगारासारख्या मूलभूत समस्या आजही सुटू शकल्या नाहीत. येत्या काळात या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी, तसेच बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती (ब) प्रवर्गात करण्यासाठी खा. राहुल गांधी यांनी पुढाकार घ्यावा यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ.राजेश राठोड यांनी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळासह खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेदरम्यान भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये माजी आमदार धोंडीराम राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्या लता राठोड, विविध जिल्ह्यातील बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ.राठोड यांनी बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत खा. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्याप्रमाणे इतर राज्यातील सर्व बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती (ब) वर्गात करावा, बंजारा समाजाच्या शिक्षण आरोग्यासह रोजगार यासारख्या मूलभूत समस्या सोडवाव्यात, बंजारा समाजाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर विविध योजना कार्यान्वित कराव्यात, बंजारा संस्कृती आणि बोलीभाषेच्या संवर्धनासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न केले जावेत, यासारख्या मागण्याबाबत चर्चा झाली. बंजारा समाज काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा असून पक्षाचा एकनिष्ठ मतदार आहे. यापुढील काळात बंजारा समाजाला अधिकाधिक प्रतिनिधित्व आणि न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन खा. राहुल गांधी यांनी शिष्टमंडळाला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याचे आश्वासन दिले होते, याबाबतचे पत्र बलदेवजी महाराज यांनी खा. राहुल गांधी यांना दाखवले.

दरम्यान, भारत जोडो यात्रेदरम्यान कळमनुरी, हिंगोली, जळगाव जामोद इत्यादी ठिकाणी बंजारा महिलांनी आणि बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत खा.गांधी यांचे स्वागत केले. भारत जोडो यात्रेत बंजारा बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...