आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य उपक्रम:संस्कारच्या विद्यार्थिनींनी बनवल्या सैनिकांसाठी इको फ्रेंडली राख्या

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून प्लास्टिक विरहित इको फ्रेंडली राख्यांची निर्मिती करून राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पोस्टद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.

संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून यापूर्वी रंगपंचमी निमित्त नैसर्गिक रंग तयार करणे, दीपावलीला आकाश दिवे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, शाडू माती पासून गणपती तयार करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांनी कापूस, दोरा, कापड, लाकूड, लोकर यापासून इको फ्रेंडली राख्या तयार करून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सैनिकांना राख्या पोस्टाद्वारे पाठविल्या आहेत.

वृक्षाला राखी बांधून पर्यावरण पूरक राखी पौर्णिमा साजरी करणार असल्याचे रामदास कुलकर्णी यांनी सांगितले. यात चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यातून प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले.यात प्रथम आकृती चव्हाण, द्वितीय दुर्गा दहिभाते, तृतीय अग्रजा बोराडे, उत्तेजनार्थ तृप्ती झडप या विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख, प्रा.राम भाले, विनायकराव देशपांडे, प्रा. केशरसिंह बगेरीया आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, सहा वर्षापासून पर्यावरण पूरक राख्या तयार करण्याचा उपक्रम सहा वर्षापासून सुरू आहे. विद्यार्थ्यांना पंधरा दिवसापासून मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या साकारल्या असल्याचे रामदास कुलकर्णी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...