आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयावर महामोर्चा:ईडीने स्वाभिमानी व्यक्तींना त्रास देणे थांबवावे, अन्यथा महामोर्चा

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार यंत्रणेच्या इशाऱ्यावर ईडीचे अधिकारी काम करीत असून स्वाभिमानी माणसांना मानसिक त्रास देऊन खोटया केसेस केल्या जात आहेत. हा प्रकार त्वरीत न थांवबल्यास कामगार संघटनेच्यावतीने मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कामगार संघटनेचे नेते पावलस निर्मल यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, ईडीेने ३१ जुलै रोजी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकून ११ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईचा आम्ही निषेध करीत असून त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी. खासदार राऊत मागील ५० वर्षापासून काम करीत असून ते स्वाभिमानी असल्यामुळे ईडीने जाणूनबुजून त्रास देणे चालू केले आहे. हा प्रकार त्वरीत थांबवावा, अन्यथा मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पावलस निर्मल यांच्यासह रविंद्र निर्मल, संजय वाघमारे, बी. आर. सकट यांच्यासह आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...