आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड ​​​​​​​:महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी संपादक महेश जोशी यांची निवड ​​​​​​​

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी जालना येथील माजी नगरसेवक तथा सायं. दैनिक राजुरेश्वरचे संपादक महेश कृष्णाजी जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान महेश जोशी हे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चित संघटनेला होणार आहे. प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्यामध्ये राज्य कार्यकारिणी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी महेश जोशी यांची निवड करण्यात आली. सदरील निवडीचे पत्र अध्यक्ष इलियास खान यांनी दिले आहे. संपादक महेश जोशी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व सामाजिकस्तरातून अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...