आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:कोरोनात पालक गमावलेल्या मुलांना जैन संघटनेतर्फे शिक्षण; गरजू विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा : बंब

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जैन संघटना तर्फे महाराष्ट्र राज्यातील कोविड १९ साथ रोगामुळेमुळे अनाथ झालेल्या मुला-मुलीचे मोफत शिक्षण, पुनर्वसन त्यांचे राहण्याचे, जेवण्याचे, औषधी, शैक्षणिक साहित्य, आरोग्य तपासण्यासाठी डॉक्टर इ. सर्व सोय, पालन-पोषणाची वर्ग ५ वी ते १२ वीपर्यंत जबाबदारी संस्थापक शांतिलाल मथा यांनी स्वीकारली आहे, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी दिली.

कोरोना काळात ज्या मुला-मुलींनी आपले आई-वडील गमावले आहे त्यांना आयुष्यातील सर्वात मोठे आव्हाण आहे. हे विद्यार्थी प्रचंड तणावा खाली जीवन जगत आहेत. आई-वडील तर आपण परत आणू शकत नाही, परंतु या दिन-दुःखी मुलांचा आयुष्याची वाट सुलभ तर करुच शकतो. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ता गावो-गावी जाऊन माहिती अर्ज गोळा करण्यात येत आहे. या मुलांना दैनंदिन शिक्षणा बरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्न दाखविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे या पाठीमागचे उद्देश आहे.

किल्लारी भूकंपातील १२०० विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे ७०० अनाथ विद्यार्थी असे एकूण ३ हजार मुलांना त्यांचे शैक्षणिक पुनःर्वसन पुर्ण करून त्यांना कर्तबगार, जवाबदार व संवेदनशील नागरिक घडविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. त्यासाठी मुलांचे शासकिय रुग्णालयाचे अथवा जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वर्ग ५, ६ किंवा ७ वी मध्येच प्रवेश देण्यात येईल. एका कुटूंबातील एक किंवा दोन बालकांनाच प्रवेश देण्यात येईल. पुणे वाघोली शैक्षणिक प्रकल्पातील वस्तीगृह मध्ये शिक्षणासाठी पाठविण्या बाबत मुलांचे आई-वडील किंवा पालकांची संमती असणे आवश्यक आहे. मुलांची यादी, सर्व कागदपत्राची पुतर्ता झाल्यानंतर मुलांची आर्थिक परिस्थती व पुर्नःवसनाची गरज यांचा विचार करुन आवश्यकता प्रमाणे वस्तीगृहात प्रवेश देण्यात येणार आहे.

संपुर्ण राज्यात या महत्वपुर्ण अभियानासाठी राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष केतन शाह, दिपक चोपडा, महेन्द्र मंडलेचा, हरकचंद बोरा, राज्य सचिव अ‍ॅड. अभय सेठिया, सहसचिव रत्नाकर महाजन प्रत्येक जिल्ह्यात संपर्क करीत आहे. जालना जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्ष दिनेश राका, शहर अध्यक्ष संतोष मुथ्था यांचाकडे प्रवेश अर्जासाठी १० जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...