आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:32 शाळांच्या मुख्याध्यापकांची शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विषय शिक्षक नसल्याच्या बाबींवरून जिल्ह्यातील माध्यमिक शाळांत आरडाओरड सुरू आहे. दरम्यान, ही बाब जाणुन घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना ३२ शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन केवळ दोन शाळांत शिक्षकांची गरज असून या ठिकाणी पदोन्नती किंवा आंतरजिल्हा बदली यातून या ठिकाणी शिक्षकांचे समायोजन केले जाणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक झाली. गणित विषयाचे शिक्षक हे विज्ञान शिकवण्यासाठी पात्र आहेत. ही जबाबदारी त्यांचीच असून नुकत्याच शिक्षण धोरणात झालेल्या बदलानुसार गरज पडेल त्या विषयाची जबाबादारी गणित किंवा विज्ञान या शिक्षकाची आहे. विद्यार्थी पटानुसार शिक्षकाने तासीका घेणे अनिवार्य आहे अशी नियमावली शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी मुख्याध्यापकांसमोर मांडली. जिल्हा परिषदांच्या हायस्कूलमध्ये विषय शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते हा मुद्दा उपस्थित करून संबंधीत गावचे ग्रामस्थ, नागरिक शिक्षण विभागात दाखल होतात.

मागील दोन महिण्यांत अनेकदा हा प्रकार घडल्यामुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील ३२ हायस्कुलच्या मुख्याध्यापकांची बैठक लावली. यावेळी त्यांनी पुनर्रचित अभ्यासक्रम तसेच विषययोजना, मुल्यमापन, तासिका वाटप याबाबतचे राज्य शैक्षणिक संंशाेधन व प्रशिक्षण परिषदेने काढलेल्या परिपत्रकच वाचन केले.

शिवाय २०१८-१९ या शैक्षणीक वर्षापासून तासिकेचे लागू असलेल्या धोरणाची माहिती दिली. इयत्ता सहावी साठी विज्ञान तंत्रज्ञान यासाठी ७ तासिका, गणित बिजगणित साठी सात, नववी दहावीसाठी ४ अशा आठवड्याच्या तासिकांची माहितीही त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...