आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा; पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

जालना20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्र्यांचा १५ कलमी कार्यक्रम देशभर राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनाला अपेक्षित असलेल्या बाबींची प्राधान्याने अंमलबजावणी करुन हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री टोपे बोलत होते. यावेळी खासदार फौजिया खान, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे सीईओे मनुज जिंदल, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री टोपे म्हणाले, अल्पसंख्याकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेकविध योजना राबवण्यात येतात. अल्पसंख्याकांना शिक्षण, रोजगार, निवारा, संरक्षण यासारख्या सुविधा मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवत असताना कुठल्याही प्रकारची उणीव राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. १५ कलमी कार्यक्रम राबवत असताना लाभार्थी योजनेपासून वंचित राहत असतील तर अल्पसंख्याक बांधवांनी त्याची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. जेणेकरुन हा कार्यक्रम जिल्हाभर राबवून समाजातील प्रत्येक घटकांना याचा लाभ देता येईल.

जालना जिल्ह्यासाठी चालू वर्षात राज्यात सर्वात जास्त ११ हजारापेक्षा अधिक घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. अल्पसंख्याक समाजातील पात्र लाभार्थींना ही घरकुले मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच तंत्र व प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्यवृद्धीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फौजिया खान म्हणाल्या, एकात्मिक बालविकास सेवांची समान उपलब्धता, शालेय शिक्षणाच्या उपलब्धतेत सुधारणा करणे, अल्पसंख्याकांच्या झोपडपट्ट्यांमध्ये सुधारणा, जातीय घटनांना आळा घालणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...