आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा:मराठी भाषेचा संकर थांबवण्यासाठी प्रयत्न व्हावे : कवयित्री डॉ. किन्हाळकर

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेचा संकर थांबवण्यासाठी प्रयत्न कले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी केले.

अंबाजोगाई मसापच्या वतीने टी‌. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारलेल्या सूर्यकांत गरुड व्यासपीठावर या तीनदिवसीय साहित्य संमेलनाचा दिमाखदार समारोप झाला. या कार्यक्रमात डॉ. वृषाली किन्हाळकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पहिल्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, डॉ. श्रीहरी नागरगोजे, नानासाहेब गाठाळ, मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे, सचिव गोरख शिंदे उपस्थित होते.

डॉ. किन्हाळकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच हे साहित्य संमेलन अतिशय वेगळी कल्पना साकारत आहे आणि या साहित्य संमेलनात अनिवासी अंबाजोगाईकरांना सहभागी होण्याची एक उत्तम आणि उत्कट संधी या संमेलनानिमित्त उपलब्ध झाली, असे सांगून भाषणाची सुरुवात त्यांनी ‘गावाची कविता’ सादर करून केली. डॉ. किन्हाळकर म्हणाल्या, स्री रोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय सुरू केली तेव्हा बाईच्या जगण्यालाच किंमत नाही तर मरण्यालाही किंमत नाही हे मला समजलं आणि या वास्तव्याने मी व्यथित होत गेले. औषधांची प्रिस्क्रिप्शन लिहिता लिहिता कविता लिहायला शिकले. या कवितांना, साहित्यांचा अनेक पुरस्कार मिळाले.

बातम्या आणखी आहेत...