आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल:घरकुल योजनेचा चौथा हप्ता तत्काळ देण्यासाठी प्रयत्न, नगराध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने यांची माहिती

जाफराबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या दोन वर्षापासुन सुरु असलेले पंतप्रधान योजनेचे बहुतांशी बांधकामे प्रगतिपथावर आहे. यातील पहिल्या टप्प्यात ७५० तर दुसऱ्या टप्प्यात १ हजार असे १ हजार ७५० लाभार्थ्यांची नावे आली आहे. यातील काहींना पहिले तीन हप्ते प्राप्त झाले चौथ्या हप्त्याची प्रतिक्षा कायम असून ही प्रतिक्षा लवकरच पूर्ण करू असे आश्वासन नगरपंचायत सभागृहात आयोजित पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थी बैठकीत नगराध्यक्षा डाँ. सुरेखा लहाने यांनी केले.

यावेळी त्यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घेत रमाई आवाज योजनेच्या लाभार्थ्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. या प्रश्नावर तोडगा काढणार असल्याची ग्वाही दिली तसेच पंतप्रधान आवास योजनेचा नगरपंचायतला जमा झालेल्या चौथ्या टप्याचा निधी लगेचच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल असे कळविले. बांधकाम झालेल्या घरकुलांवर सर्वानुमते एकच फिकट गुलाबी कलर मारुन एक नविन आदर्श तालुका जिल्हावासियांना देऊन शहराचा विकास व एकता अबाधित राहील असे कार्य आपल्या सर्वांच्या हाताने व्हावे असा सल्लाही त्यांनी लाभार्थ्यांसह उपस्थित नागरीकांना दिला. या या वेळी नगरसेवक अनिल बोर्डे, विजय गोफणे, विनोद वाकडे, शे.जुनेद, अंकुश पंडीत, संतोष वगरे, दिलिप बोबडे, दामोधर लोखंडे, अमोल ढवळे, शे. आवेज, शे. गफ्फार यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...