आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:नाव्हा येथे उभ्या असलेल्या आयशरला लागली आग; आयशच्या डिझेल टॅँकचा स्फोट होईल या भीतीने आग विझविण्याचा प्रयत्न फसला

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, द्राक्ष घेऊन जाणाऱ्या आयशरला आग लागल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जालना-सिंदखेड राजा रोडवरील नाव्हा येथे घडली. आयशरच्या टँकमध्ये फुल्ल भरून डिझेल असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगली. परंतु, या आगीत आयशर जळून खाक झाले आहे.

जालना तालुक्यातील नाव्हा येथे आयशयरला अचानक आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. द्राक्षाची वाहतूक करण्यासाठी आणलेल्या रिकाम्या प्लास्टिक क्रेटने पेट घेतल्याने आग वाढतच गेली. स्थानिक नागरिकांकडून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु वाढती उष्णता आणि पाण्याची कमी असल्याने आगीने भडका घेतला.

नागरिकांनी अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली. परंतु, अग्निशमन बंब यायला उशीर होता. दरम्यान, आयशर ट्रकचा डिझेल टँक फुल्ल भरलेला असल्यामुळे स्फोट होईल या भीतीने आग विझविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. आगीत आयशर ट्रक जाळून खाक झाले आहे. अचानक झालेल्या या घटनेने नागरिकांनी एकच गर्दी केली होती. गाडीचा स्फोट होण्याच्या भीतीने नागरिक सुद्धा गाडीजवळ जाण्यास धजावत नव्हते.

शेवटी भीषण आगीने आयशर आणि प्लास्टिक क्रेट जळून खाक झाले आहेत. उन्हाळा सुरू झाल्यापासून आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे आग लागत आहे.