आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:भोकरदन-जालना मार्गावर आयशर ट्रकच्या धडकेत दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

भोकरदन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यावर आयशर ट्रक (क्र, जी जे 26, टी 5961) व सीबीझेड मोटारसायकल (क्र एम एच 21 झेड 0707) यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार तरुण शेख कलीम शेख रईस (वय 16 वर्ष) याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान भोकरदन-जालना रोडवर एका व्यापारी संकुलासमोर हा भीषण अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान, मेकॅनिकचे काम करणारा शेख कलिम हा गावात फळविक्री करणाऱ्या आपल्या वडिलांना भेटून मोटारसायकलवर गॅरेजकडे चालला होता. दरम्यान पाठी-मागून येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. धडकेनंतर कलिम मोटारसायकल वरून खाली पडला तसा ट्रक त्याच्या अंगावरून गेला आणि त्यातच त्याचा चिरडून मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटना स्थळावरून पळ काढला. भोकरदन पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांनी तात्काळ मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठवला व ट्रक मोटारसायकल दोन्ही वाहने ताब्यात घेतली.

भोकरदन ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. भोकरदन शहरातील केळणा नदी काठावरील कब्रस्तान मध्ये शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. भरस्त्यात रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या भीषण अपघाताचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. घटनास्थळी छिन्नविच्छिन्न मृतदेह बघून सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

भोकरदन शहरातील उस्मानपेठ भागातील पान गल्लीत राहणारे शेख रईस फळविक्रीचा धंदा करतात. कलीम (वय 16 वर्ष) हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. कलीमच्या अकस्मात अपघाती मृत्युमुळे परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

बातम्या आणखी आहेत...