आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाला आग:ढोणवाडी शिवारातील आठ एकर ऊस तारांमुळे जळाला; तीन शेतकऱ्यांचे आठ लाखांचे नुकसान

आष्टी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे आष्टी परिसरात अतिरिक्त ऊस झाल्याने तारखा होऊन चार चार महिने उलटत आलेले असतानाही ऊसाची तोड होत नाही. शेतकरी हतबल झालेले असताना दुसरीकडे प्रचंड उन्हाचा पारा वाढलेला असताना शेतातून जाणाऱ्या तारांमुळे शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यातच शुक्रवारी ढोणवाडी शिवारात तिन शेतकऱ्याच्या ऊसला शॉर्ट सर्किट मुळे आठ एकर ऊसाला आग लागून आठ लाख रूपयांचे नूकसान झाले आहे.

ढोणवाडी शिवारात लक्ष्मण दाजीबा पाटील यांचे चार एकर, विठ्ठल मानिक पाटील यांचे तीन एकर व मानिक पाटील यांचे एक एकर ऊसला दुपारी एक वाजेच्या सुमारास शेजारच्या शेतात शॉर्ट सर्किट होऊन तुटलेल्या ऊसाच्या पाचट पेटले. या मुळे लक्ष्मण पाटील यांच्या ११३ मधील चार एकर ऊसला आग लागली. यात संपूर्ण आठ एकर ऊस जळुन खाक झाला. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी महसूल च्या वतीने तलाठ्या कडून पंचनामा करण्यात आला. दरम्यान, आष्टी परिसरात अद्याप मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असून तोडणी अभावी शेतकऱ्याचा ऊस शेतात ऊभा आहे. परिणामी कडाक्याच्या उन्हाळ्यात ऊस जळण्याचे प्रकार होत आहे.

बातम्या आणखी आहेत...