आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका गावातील कार्तिक वजीर या इयत्ता चौथीतीलविद्यार्थ्यांने लोकशाहीवर शाळेत दिलेले भाषणाची चर्चाच चर्चा आहे. हे भाषण ऐकून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी त्याची भेट घेतली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज वाटूर (ता. परतूर, जि. जालना) येथे भेट घेतली. त्याचे कौतूक करून त्याच्या डोळ्यावरील उपचारासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
कार्तिक वजीर हा रेवलगाव (ता.अंबड जि. जालना) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतो. प्रजासत्ताक दिनी त्याने आपल्या भाषणातून राज्यातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. लोकशाहीवर त्याने भाषण केल्यानंतर माध्यमांनीही त्याची दखल घेतली त्यानंतर त्याचे भाषण सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाटूर (ता. परतूर) येथे कार्तिकची भेट घेत त्याचे कौतूक केले.
कार्तिकचे भाषण जशास तसे!
भाषणात कार्तिक वजीर म्हणाला होता की, खरंतर आज लोकशाही दिन आहे. आजपासून लोकशाही सुरू झाली. मला लोकशाही खूप आवडते. कारण लोकशाहीमध्ये तुम्ही काहीही करु शकता. प्रेमाने राहू शकता, भांडू शकता, पण मला मोक्कार धिंगाणा करायला, माकडासारखे झाडावर उड्या मारायला, फिरायला खूप आवडते. माझे बाबा मला कधीही मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात. मात्र, माझ्या गावातील लहान मुलं माझं नावं सरांना सांगतात आणि दहशतवादी जशी लोकशाही पायदळी तुडवतात तसे सर मला पायदळी तुडवतात. माझ्यासारखा गरीब मुलगा आख्या तालुक्यात आढळणार नाही.'' या मुलाच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राजेश टोपेंनीही केले होते कौतूक
या अगोदर राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनीही कार्तिकला आपल्या घरी बोलावून त्याचे भाषण ऐकले आणि त्याचे कौतुकही केले होते.
हे तर आमच्या मतदारसंघातील टॅलेंट
माजी आरोग्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी कार्तिकबाबत फेसबूवर एक पोस्ट केली. ते त्यात म्हणाले, प्रजासत्ताक दिनानिमित्त एका शालेय मुलाने केलेले संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड व्हायरल झाले. अक्षरशः हजारो लोकांनी ते स्टेटसला तर ठेवलेच पण सोशल मीडियावर पोस्टही केले. हे भाषण कार्तिक वजीर या पहिलीतील मुलाचे असून हा मुलगा रेवलगाव तालुका अंबड या माझ्या मतदारसंघातील आहे. कार्तिक हा अत्यंत खोडकर आणि उत्साही मुलगा आहे. त्याच्या भाषणातून त्याला लोकशाहीची असलेली पुसटशी का होईना पण जाणीव दिसून येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.