आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवीगाळ:उस्मानापूर येथे निवडणूक; चौघांकडून एकास मारहाण

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी उभे का केले म्हणून चौघांनी एकास शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना परतूर तालुक्यातील उस्मानापूर येथे घडली. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

येथील किसन भीमराव आंबेकर हे पत्नी व मुलगा योगेश याच्यासह घरी असताना गावातील संशयित ओमप्रकाश काशीनाथ राऊत, रामेश्वर काशीनाथ राऊत, परमेश्वर रामेश्वर राऊत, दिनकर रामेश्वर राऊत हे चौघे घरात घुसले. त्यांनी मुलगा योगेश यास ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदासाठी उभे का केले असे म्हणून मारहाण केल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...