आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:पारध खुर्द ग्रामपंचायत उपसरपंचपदी भागवत लक्कस यांची निवड; बैठकीत ही अटीतटीची निवडणूक प्रक्रिया

पारध11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द ग्रापंचायतच्या उपसरपंचपदी भागवत दौलत लक्कस यांची वर्णी लागली. चुरशीच्या निवडणुकीत भागवत लक्कस यांना सहा मते मिळाली तर विरोधी उमेदवार रामेश्वर लक्कस यांना शून्य मते मिळाली.

पारध खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रुख्मणबाई लक्कस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन या बैठकीत ही अटीतटीची निवडणूक प्रक्रिया ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. भागवत लक्कस यांच्या निवडीबद्दल माजी सभापती मनीष श्रीवास्तव, आण्णा पाटील लक्कस, रमेश लक्कस, मुकेश लक्कस, नाना लक्कस, संजय लक्कस, ईनुसशाह मदार, ज्ञानेश्वर लक्कस, भिकू लक्कस, राजधर लक्कस, हाफीज सादिक, नारायण पवार, पंढरीनाथ घुसळे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...