आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिवार्षीक निवडणूक:गुजराती समाज अध्यक्षपदी रमेशभाई पटेल यांची निवड

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजराती समाजाची त्रिवार्षीक निवडणूक रविवारी गुजराती समाजाच्या सभागृहात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी भाईश्री रमेशभाई पटेल, उपाध्यक्ष प्रविणभाई भानुशाली, सचिवपदी जयेशभाई बावीसी, कोषाध्यक्षपदी अरविंदभाई महेता व सहसचिवपदी विपुलभाई गोसराणी यांची निवड करण्यात आल्याचे निवडणुक अधिकारी अॅड. सतीष तवरावाला यांनी जाहीर केले.

सार्वत्रिक निवडणुकीत नियुक्त पदाधिकाऱ्यासह दिपकभाई भानुशाली, दिलीपभाई भारदिया, अमितभाई गणात्रा, किरणभाई हंसोरा, अभयभाई महेता, परेशकुमार महेता, अभयकुमार नानावटी, देवजीभाई पटेल, हरेशभाई पटेल, हरेशभाई शाह, हितेशभाई सरवैय्या, दिलीपकुमार शाह, जिग्नेशभाई शाह, पियुषभाई शाह, विनयभाई शाह व हरदासभाई सेंगाणी निवडून आले आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रमेशभाई पटेल म्हणाले, माझे संपुर्ण संचालक मंडळ व पदाधिकारी यांच्याशी सुसंवाद साधुन गुजराती समाज आणि शाळेच्या उत्कर्ष विकासासाठी प्रयत्न केले जातील. शाळेचे नाव लौकिक होण्यासाठी प्रयत्न केले जातील. सामाजिक संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी उत्सव आणि परंपरांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. यावेळी चेअरमन ओमप्रकाश कावळे, मुख्याध्यापक सतिष देशमुख, राम सरनाईक, उपमुख्याध्यापक नामदेव सावंत, मनोजभाई गोहेल यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...