आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकी वसुली मोहीम:मंठ्यात वीजवसुली सुरू; अडीच लाख झाले वसूल

मंठा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा शहरात वीज वितरण कंपनीने थकबाकी बिलाबाबत वसुली मोहीम सुरू केली आहे. रविवार असूनही महावितरण कंपनीच्या वसुली पथकाने दिवसभरात दोन लाख ६५ हजार रुपये वसूल केले. थकबाकी असलेल्या एकूण ४४ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर १६ आकडेबहाद्दरावर कारवाई करण्यात आली.

जालना येथील कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती यांच्या उपस्थितीमध्ये वीज वसुली मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सहायक अभियंता अनिल जंगम, कर्मचारी दत्तात्रेय भोम्बे, विष्णू घनवट, सोपान वाघ, कुलदीप वाघमारे, विक्रम घनवट, नामदेव गवळी, सुनंदा सोळंके, बापू मिसाळ, विशाल मस्के, एस. देशमुख, संतोष पौळ, एकनाथ पाटील, देविदास काळे, रवीकुमार जैद, नवनाथ देशमुख, सचिन मोरे दिनेश गादेवाड, भारत अवचार, सुरेश मोरे यांच्या पथकाने कारवाई केली.

शहरात सुमारे चार हजारांपेक्षा जास्त वीज ग्राहक असून ८८ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकीदारांना दणका देण्यासाठी शहरातील विविध भागात दिवसभर पथक फिरत होते. यामध्ये ४४ थकबाकीदार वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला गेला, तर १६ आकडेबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. ऐन सणासुदीत वितरण कंपनीने वसुलीची मोहीम हाती घेतल्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहक चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान थकबाकीदार वीज ग्राहकांनी वीज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी. वीज चोरी करू नये अधिकृत वीज जोडणी करून सन्मानित ग्राहक होण्याचे आवाहन सहायक अभियंता अनिल जंगम यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...