आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांवर संकटाची‎ मालिका:तीर्थपुरी परिसरात शेतकऱ्यांवर‎ वीजपंप चोरीचे संकट‎

तीर्थपुरी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरातील‎ शेतकऱ्यांच्या वीज पंपाची चोरी होत असल्याने‎ शेतकऱ्यावर संकटांची मालिका सुरू झाल्याचे‎ दिसून येत आहे. अगोदरच कापसाला भाव‎ मिळत नसल्याने कापूस घरात पडून आहे,‎ ऊसाला तोड मिळत नाही, ऐन पिकाला पाणी‎ देण्याच्या वेळेसच वीज कट करण्याचा‎ उद्दामपणा वीज वितरणकडून सुरू आहे,‎ कशीबशी इकडून तिकडून वीज जोडून घेत‎ विजपपं सुरू करून पिकाला पाणी देत‎ असतांना चोरट्यांनी डाव साधत विजपपं‎ चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांवर संकटाची‎ मालिका सुरू झाली .

सध्या जायकवाडीच्या‎ डाव्या कालव्याला पाणी सोडले असल्याने‎ कालव्याचे पाणी शेतातील पिकांना देण्यासाठी‎ दहीगव्हाण येथील शेतकरी विष्णू दहिभाते या‎ शेतकऱ्याने डाव्या कालव्यावर वीज पंप‎ बसवला असून त्यांच्या वीज पंपाची रात्रीच्या‎ अंधारात अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.‎ याबाबद विष्णू दहिभाते या शेतकऱ्याने गोंदी‎ पोलीस ठाणेअंतर्गत तीर्थंपुरी पोलीस चौकीला‎ चोरीची तक्रार दिली आहे. कालव्यावरील‎ विजपंपाची चोरी होत असल्याने आर्थिक‎ फटका बसत आहे. पोलिसांनी चोरीचा तपास‎ लावण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...