आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपकेंद्र उभारण्याची मागणी:दिवसाआड  वीज पुरवठा, शेतकरी त्रस्त

तळणी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक दिवसाआड विजपुरवठा होत असल्यामुळे तळणी आणि परिसरातील शेतकरी हैराण झाले अाहेत. सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी पेवा येथे ३३ केव्ही उपकेद्र उभारण्याची मागणी केली जात आहे.

तळणी परिसरातील पेवा, किर्तापूर, अंभोरा शेळके, खोरवड, खोराड सांवगी, पांगरा, गडदे, पाडळी, किनखेडा, मोहदरी, नळडोह या गावातील शेतकरी वीज समस्येने ञस्त झाले आहेत. रब्बी हंगांमाच्या पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मुबलक पाणीसाठा असुनही अपुरा आणि कमी दाबाच्या वीज पुरवठयामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. रब्बी हंगामातील तूर, हरभरा, कापूस, ज्वारी इतर पिकांना याचा फटका बसत आहे. या भागातील दहिफळ खंदारे ३३ केव्ही उपकेद्रांतून वीजपूरवठा होत असला तरी त्यावर अतिरीक्त भार पडत आहे.

तसेच एकाच फिडरवर तेरा त्ते चौदा गावे जोडलेली असल्याने कमी दाबाचा विजपुरवठा होत असल्याने शेती पंप जळण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. एकाच फिडरची विभागणी दोन भागात केल्याने रोज मिळणारी विज एक दिवस आड मिळत आहे. आमदार बबन लोणीकर यांच्या प्रयत्नातून पांगरी वायाळ या ठिकाणी ३३ केव्ही उपकेद्र मंजूर केले. परंतू या उपकेद्रांचे काम संबधित गुतेदाराने अर्धवट टाकले असून या भागात विज समस्येला शेतकऱ्यांना तोड द्यावे लागत आहे. पांगरी वायाळ ३३ केव्ही उपकेद्रांतर्गत तीन फिडरचे काम करायचे असताना संबधित गुत्तेदारानी दोनच फिडरचे काम पूर्ण केले.

एका फिडरचे काम केलेच नसल्याने शेतकऱ्यांना वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. अपूऱ्या फिडरच्या कामामूळे ऐन रब्बी हंगामात वीज पूरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, पेवा येथे उपकेद्र अस्तित्वात आले तर आनंदवाडी, हनवतखेडा, उस्वद, पूर्णा नदी काठच्या शेतकऱ्यांना फायदा होईल. दहिफळ व तळणी ३३ केव्ही उपकेद्रांतर्गत येणाऱ्या गावाची संख्या कमी होऊन परिणामी त्या केद्रावरील भार कमी होऊन वीजपुरवठा सुरळीत होईल. पांगरी वायाळ येथील ३३ केव्ही उपकेद्राचे काम ईन्फ्रा औरगाबाद यांच्याकडे आहे अपूर्ण असलेले फिडरचे काम एक महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

फिडरचे काम लवकर
खोरवडसह संपूर्ण तेरा चौदा गावात वीजेच्या समस्येमुळे शेतकरी ञस्त आहे. अपूर्ण फिडरचे काम लवकरात लवकर करुन रब्बी हंगामासाठी वीजपुरवठा सुरळीत करून द्यावा, अशी मागणी गोविंद नवघरे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...