आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी त्रस्त:एक दिवसाआड अन‌  तेही सहा तासच मिळतो वीजपुरवठा;आन्वा परिसरात जास्त क्षमतेेेचे रोहित्र बसवण्याची मागणी

आन्वा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील आन्वा आणि परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण झाले आहेत. विहिरी तुडुंब भरलेल्या असतानाही परंतु विजेअभावी शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पिकांना पाणी देता येत नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आन्वा येथील ३३ केव्ही सबस्टेशन १९७८ मध्ये स्थापन झालेले आहे. तेव्हापासुन बसवलेले पाच एमव्हीचे केवळ दोन रोहित्र आजही कायम आहेत. एकदाही बदललेले नाहीत. मागील ४४ वर्षांत वीज ग्राहकांची संख्या दहा पटीने वाढ झाली परंतु सबस्टेशनमध्ये म्हणावी तशी वाढ झाली नाही. या उपकेंद्रात दहा एमव्हीचे तीन ट्रान्सफॉर्मर बसवणे अपेक्षित आहे त्यामुळे उपकेंद्राची क्षमता वाढेल. आन्वा येथील ३३ केव्ही सबस्टेशनमध्ये पाच एमव्हीचे दोन एमव्हीचे रोहित्र बसवलेले आहे तरी पण यातून अत्यंत कमी दाबाने विज पुरवठा होत आहे. यामुळे शेतातील पंपदेखील चालत नाहीत. गावातील वीज ग्राहकांची साधी नळाला लावलेली मोटारसुद्धा चालत नाही. आन्वा युनिटअंतर्गत जवळपास १७ गावे येतात.

यात आन्वा, आन्वा पाडा, जळगाव सपकाळ, हिसोडा, पळसखेडा, कोठाकोळी, कल्याणी, सुरंगली, करजगाव, कठोरा, वाकडी, कुकडी, कोदा, धोनखेडा, जानेफळ, कार्लावाडी या गावांचा समावेश आहे. या यूनिटमध्ये चार हजार पंपधारक आहेत. दोन पाच एमव्हीचे रोहित्र असून पाच एमव्हीच्या रोहित्रावर २६० एएमचा लोड घेता येतो परंतु प्रत्येक फिटरवर दुप्पट लोड येत आहे. एका रीहित्रावर दोन फिटर सुरू होतात. यात जानेफळ २३० एएम, वाकडी २०० एएम असा एका फिटर ४०० चा लोड होतो. तर आन्वा २०० एएम, कल्याणी १९० एएम, असा ३९० चा लोड होतो. परंतु हा लोड रोहित्रच्या क्षमतेचा दुप्पट आहे. परिणामी हे फिटर वेळोवेळी ट्रीप होते. म्हणून उपकेंद्रातून एक फिटर दोन ठिकाणी विभागले आहे.

त्यामुळे एका भागातील शेतकऱ्यांना केवळ सहा तास विसरू उडवतो व दुसऱ्या दिवशी ते फिटर बंद करून दुसऱ्या भागातील वीज पुरवठा करण्यात येतो त्यामुळे पहिल्या भागात वीज पुरवठा दिलेल्या शेतकऱ्या तिसऱ्या दिवशी लाईन मिळते जवळपास ४८ तास झाल्यानंतर या शेतकऱ्यांना वीज बोर्ड मिळतो. या भागातील शेतकऱ्यांना एक दिवसाआड केवळ सहा तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे या परिसरातील विज पुरवठा वेळोवेळी खंडित होत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देण्यास अडचण होत आहे. पाच एमव्हीच्या रोहित्रवर जास्त भार असल्यामुळे हे रोहित्र वेळोवेळी बंद पडत आहे. प्रति दहा मिनिटाला विजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे या गावातील शेतकरी हैराण झाले आहे. या रोहित्रची क्षमता वाढवावी व विज चोरी रोखण्याची मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांतून केली जात आहे.

येत्या मार्च महिन्यापर्यंत नवीन रोहित्र बसवले जाईल
आन्वा सबस्टेशनअंतर्गत १७ गावांना वीजपुरवठा केला जात असून चार हजार पंपधारक व २५०० घरगुती ग्राहक आहेत. शेतातील वीजपंप चालू झाल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळेच भारनियमन वाढले आहे. नवीन मोठ्या रोहित्राची मागणी आम्ही वरिष्ठ कार्यालयात केली आहे. मार्चपर्यंत मोठे रोहित्र बसवले जाईल. -पी. बी. गावंडे, कनिष्ठ अभियंता, आन्वा

बातम्या आणखी आहेत...