आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यांतील खासगीकरण धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते व अधिकारी संघर्ष समितीने तीन दिवसीय संप पुकारला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी शीर्षासन करून निषेध केला. मंठा येथील विद्युत वितरण विभागाचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये, कंत्राटी आऊटसोर्सिंग व सुरक्षारक्षक कामगारांना कायम करावे, तीनही कंपन्यांतील रिक्त जागा तात्काळ भराव्यात, महावितरण मधील २०१९ नंतरचे उपकेंद्रे कंपनी मार्फत चालवावीत तसेच उपकेंद्रामध्ये कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करावी अशा मागण्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघर्ष समितीने केल्या आहेत.
संपावर जाण्यापूर्वी विद्युत वितरण कर्मचाऱ्यांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मोबाईल चार्जिंग करून ठेवणे, पाण्याच्या टाक्या भरून ठेवणे तसेच दळणासह अत्यावश्यक बाबी पूर्ण कराव्यात असे आवाहन करण्यात आले.
आपल्या मागण्या मान्य न झाल्यास १८ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या संपात उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार, सहाय्यक अभियंता प्रवीण गणेर, कनिष्ठ अभियंता अनिल जंगम, सचिन पवार, कुलदीप वाघ, दत्तात्रय भोम्बे, विष्णू घनवट, रतन खनपटे, विक्रम घनवट, दिनेश गादेवाड, सोपान वाघ, भारत नळगे, कृष्णा निकम, सचिन मोरे, सुनील घोरबांड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.