आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध आंंदोलन:वीज कामगार जानेवारीमध्ये  संपावर जाण्याच्या तयारीत

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध वीज कामगार जानेवारीत बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संघर्ष समितीच्या जालन्यातील बैठकीत हा इशारा देण्यात आला. अदानी इलेक्ट्रिक कंपनीने वीज नियामक आयोगाकडे समांतर परवान्यासाठी अर्ज केलेला आहे. ही बाब म्हणजे महावितरणचे खासगीकरण होय. यामुळे महावितरणच्या आयत्या यंत्रणेवर खासगी कंपन्या रेघोट्या मारणार आहे. ही बाब महावितरण, ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असून समांतर परवान्याला परवानगी देण्यात येऊ नये, अशी संघटनेची मागणी आहे.

जर खासगी कंपनीला परवाना देण्यात आला तर याचा सर्वच ग्राहकांवर परिणाम होईल. याला विरोध करण्यासाठी संघटनांनी एल्गार केला असून याविरोधात बैठक घेण्यात आली. यामध्ये वर्कर्स फेडरेशनचे आयाज खान पठाण, संतोष मिसाळ, अमर डांगे, संजय मगरे, सब सबर्डिनेट इंजिनिअरचे आर. ए. नागरे, वीज तांत्रिक कामगार संघटनेचे शेडमल्लू उपस्थित हेाते.

बातम्या आणखी आहेत...