आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणे महागात:अकरा पोलिस अधिकारी; कर्मचाऱ्यांना काढल्या नाेटिसा

जालना4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जालना जिल्ह्यातील विविध ठाण्यांतील ११ अधिकाऱ्यांसह बिट अंमलदारांना पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत.अवैध धंदे सुरू राहू नये म्हणून पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी एक नंबरही सुरु केला. कुठे अवैध धंदे सुरु असल्यास त्याची माहिती नंबरवर द्यावी, असे आवाहन एसपी शिंदे यांनी केले आहे. अवैध धंद्यावर कारवाया करण्यासाठी पथकही स्थापनही केलेले आहे.

दरम्यान, नविन पथक झाल्यापासून बार अवैध कारवाया झाल्या आहेत. वारंवार तोंडी आदेश देऊनही जालना शहरासह जिल्ह्यातील विविध ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एसपींनी संबंधित अधिकारी, बिट अंमलदारांना नोटिसा काढल्या आहेत. अवैध धंद्यावर कारवाया करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या पथकात सहायक पोलिस निरीक्षक योगेश धोंडे, अंबादास साबळे, गजानन भोसले, लक्ष्मीकांत आडेप, किरण मोरे, संगीता चव्हाण यांचा समावेश आहे. या पथकाने आठ दिवसातच दहा कारवाया केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...