आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढत्या महागाईमुळे सर्वसामान्याना घर खर्चाचे नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महागाईमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना गॅस सिलिंडरचा दरवाढीचा भडका सहन होऊ शकत नाही जाफराबाद तालुक्यात उज्ज्वला योजनेअंतर्गत दहा हजारापेक्षा जास्त महिलांना दिलेले गॅस सिलेंडर अडगळीत पडले आहेत. ग्रामस्थांनी पावसाळ्यात सरपण म्हणून पळाट्याची साठवणूक करणे सुरू केले आहे.
केंद्र शासनाने उज्वला योजनेंतर्गत देशामध्ये मोफत गॅस सिलिंडरचे वितरण केले धुरापासून स्वयंपाक करणाऱ्या महिलांची मुक्तता व्हावी म्हणून ही योजना ग्रामीण भागात मोठा वाजागाजा करून सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत जाफराबाद तालुक्यामध्ये जवळपास दहा हजार महिलांना उज्वला गॅसचे वितरण करण्यात आले. गॅस सिलेंडर प्रारंभी मोफत मिळाले असले तरी आता सिलेंडर भरण्याचा खर्च गोरगरिबांना परवडणारा नाही.
यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी पुन्हा चुली पेटवल्या आहेत. अनेकांनी गॅस सिलेंडर अडगळीत टाकले व शेतातील विविध प्रकारचे जळतंण जमा करणे सुरू केले आहे. शक्यतो पऱ्हाट्या जळतण म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. गॅस सिलेंडर सोबतच डिझेलचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मशागतीच्या कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करताना जास्तीचा आर्थिक भार सोसावा लागत आहे. ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करताना गतवर्षीपेक्षा दीडपट पैसे जास्त लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान संकटात सापडले असल्याने पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी होत आहे.
किमती स्थिर ठेवाव्यात दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढतच असून खाद्यतेल, दाळी यासोबतच आता गॅस सिलेंडरची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या जगण्याचे गणित कोलमडले आहे. यामुळेच केंद्र सरकारने किंमती कमी कराव्यात. अशी मागणी ग्रा.पं.सदस्या स्वाती बोरसे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.