आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत च्या रोजगार हमी योजना खात्यातील निधीच्या रकमा मुलांच्या खात्यात वर्ग करून पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुंडेवाडी (ता. जालना) येथील उपसरपंच सुमनबाई नारायण गजर यांचे पद जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवले आहे. जानेवारी २९२१ मध्ये गुंडेवाडीच्या उपसरपंचपदी सुमनबाई नारायण गजर यांची निवड झाली होती. त्यांनी पदाचा गैरवापर करत दोन्ही मुलांच्या खात्यात रोहयोच्या निधीतील रकमा वळविल्या बाबत ज्ञानेश्वर पोटे यांनी ॲड. विलास भुतेकर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात विवाद अर्ज दाखल केला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष झालेल्या सुनावणी दरम्यान ॲड. विलास भुतेकर यांनी सक्षमपणे बाजू मांडताना उपसरपंच सुमनबाई नारायण गजर यांनी पदाचा दुरुपयोग करत रोजगार हमी योजनेच्या खात्यातून १२ एप्रिल २०२१ रोजी दोन्ही मुलांच्या नावावर ५८ हजार आणि २४ हजार असे एकूण ८२ हजार रूपये वर्ग करून सदरील रकमांचा स्वतः आणि कुटुंबियांना आर्थिक लाभ करून घेतला असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे उल्लंघन केल्याची बाब ॲड. विलास भुतेकर यांनी पुराव्यानिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सादर झालेले पुरावे आणि ग्रामपंचायतच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक जालना शाखेतील रोहयो खाते उतारा यांचे अवलोकन करून सुमनबाई नारायण गजर यांचे उपसरपंच आणि सदस्यत्व रद्द ठरवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.