आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सेवा प्रकल्प माध्यमातून दुर्बलांचे सशक्तीकरण ; गरजूंना शिलाई मशीन वाटप

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील गरजवंतांना मदतीस तत्पर असलेल्या लॉयन्स संस्थेमार्फत प्रांतात दुर्बल घटकांचे सशक्तीकरण होण्यास सहाय्यभूत असे नाविन्यपूर्ण सेवा प्रकल्प दिलासादायक ठरतील. असा विश्वास लॉयन्स चे प्रांतपाल पुरूषोत्तम जयपुरिया यांनी व्यक्त केला.प्रांतपालांच्या सन्मानार्थ लॉयन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊन तर्फे संपूर्ण प्रांतात मोफत १०१ शिलाई मशीन वाटपाचा शुभारंभ प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया, विवेक गावंडे, सुनील बियाणी, राजेश भुतिया, राधेश्याम टिबडेवाल, कमलकिशोर बगडिया, पवन देशमुख, राजेश लुणिया, दिनेश शिनगारे, सौरभ पंच , स्वप्नील पंचगडे, आदी उपस्थित होते. सदरील प्रकल्पासाठी प्रांताचे जनसंपर्क अधिकारी मुरलीधर उपाध्याय, मुकेश शर्मा, संतोष अग्रवाल, सुभाष चांडक, महेंद्र खेतान यांनी आर्थिक सहकार्य केल. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी प्रांताच्या चौदा जिल्ह्यांतील विविध क्लबना वितरित केल्या जाणाऱ्या शिलाई मशीनमुळे विधवा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना स्वयंरोजगारास साधन मिळून कुटुंबास हातभार लागेल. असे नमूद केले. दरम्यान, लॉयन्सतर्फे यापुर्वी जलशुद्धीकरण यंत्रे, छञ्या, तिरंगा ध्वजांचे वाटप केले असून या पुढे ही असेच लोकोपयोगी सेवा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. विवेक गावंडे यांनी क्लब मार्फत सुरू असलेल्या सेवा कार्यांची माहिती दिली. सुनील बियाणी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...