आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:चातुर्मास समाप्ती; गौतममुनी व वैभवमुनींचे मानले आभार

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर, संस्कार , धर्म, आचारण आणि संसाराबाबत ज्ञान देऊन गेले चार महिने सातत्याने प्रवचनाव्दारे मार्गदर्शन करुन प. पू. डॉ. गौतममुनी आणि आगमज्ञाता प. पू. वैभवमुनी यांचे उपस्थित श्रावक आणि श्राविकांनी आभार व्यक्त केले.

येथील शिवाजी पुतळ्यानजीक असलेल्या तपोधाममधील गुरु गणेश सभा मंडपात अखंडपणे आणि नियमीत सुरु असलेल्या चातुर्मासाची आज पौर्णिमेच्या दिवशी समाप्ती झाली. त्यानिमित्त उपस्थित श्रावक- श्राविकांनी दोन्ही मुनींचे आभार व्यक्त करणारी भाषणे केली. दोन्ही मुनींनी गेले चार महिने दररोज अगदी वेळेवर येऊन आपले प्रवचन ऐकवले. त्यात कसली बाधा येऊ दिली नाही. किती श्रावक- श्राविकांची उपस्थिती आहे, हेही पाहिले नाही. अगदी नियमितपणे प्रवचनाव्दारे घर, संस्कार , धर्म, आचारण आणि संसाराबाबत ज्ञान देऊन भगवान महावीरांबद्दल माहिती देतांनाच अन्य विषयावरही मार्गदर्शन केले. सर्व देवगण चार महिने योगनिद्रेत जातात तो कालावधी म्हणजे चातुर्मास! चातुर्मास देवशयनी एकादशीपासून सुरू होतो आणि देवउठनी एकादशीला संपतो.

दहा जुलैपासून सुरू झालेला चातुर्मास सात नोव्हेंबरला समाप्त झाला. चातुर्मासाला धार्मिक महत्त्वही आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे चातुर्मास झाला नाही. परंतू यावर्षी मात्र तो अत्यंत चांगल्या रितीने करण्यात आला. चातुर्मासादरम्यान आलेल्या पर्यषण पर्वही चांगल्यारितीने साजरे करण्यात आले. चातुर्मास समाप्तीनिमित्त स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने गेले चार महिने विविध प्रकारचे उपवास करणाार्‍यांचा यावेळी ंयथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी प. पू. डॉ. श्री. गौतममुनीजी म. सा; प्रवचन प्रभावक प. पू. श्री. वैभवमुनीजी म. सा; प. पू. श्री. दर्शनप्रभाजी म. सा; सेवाभावी प. पू. श्री गुलाबकंवरजी म. सा. सेवाभावी प. पू. श्री हर्षिताजी म. सा. आदींसह श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे आजी- माजी पदाधिकारी, श्रावक- श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी अत्यंत उकृष्टपणे केले.

बातम्या आणखी आहेत...