आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेडलाइन:पीएम किसानच्या साडेआठ लाख खात्यांच्या डेटा दुरुस्तीला सप्टेंबरअखेरची डेडलाइन

बाबासाहेब डोंगरे। जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत महाराष्ट्रात ८ लाख ३७ हजार खातेदारांची माहिती दुरुस्तीसाठी प्रलंबित असल्यामुळे संबंधितांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे महसूल व वन विभागाकडून माहितीच्या दुरुस्ती व खात्रीसाठी कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाला येत्या ३० सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे. यानुसार आरडीसी केशव नेटके यांनी जिल्ह्यातील आठही तालुक्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे आठ उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांच्यावर ३१ ऑगस्टपर्यंत लँड डेटा डिटेल्स अपलोडिंगचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पीएम -किसान योजनेच्या कामाबद्दल महसूल व कृषी विभागात मतभेद असल्यामुळे योजनेची अंमलबजावणीची गती मंदावली होती. यातच राज्यात सत्तांतर झाल्यामुळे हा विषय बाजूला पडला होता.

मात्र, नवीन सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार होताच हा विषय अजेंड्यावर आला. यानुसार महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना व तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव एकनाथ डवले, सहसचिव संजय बनकर, श्रीराम यादव, डॉ. माधव वीर, तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे, तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल आदींची २३ रोजी विधानभवनात बैठक झाली. यात संबंधितांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत सहमती दर्शवली. त्यामुळे खातेदारांच्या माहिती दुरुस्तीच्या कामाला गती आली आहे.

गटनंबर, खातेनंबर तपासणी करून खात्री करणे आवश्यक
लाभार्थी खातेदारांचा पीएम किसान पोर्टलवरील डेटा खातरजमा करून कालमर्यादेत केंद्र शासनास सादर करावयाचा असल्याने तलाठ्यांनी पोर्टलवरील डेटामधील खातेदारांची गट नंबर, खातेनंबरनिहाय तपासणी करून संबंधित खातेदारांची खात्री करावी विवरणपत्रात माहिती भरावी, असे निर्देश कार्यासन अधिकारी श्रीकांत म. मोहिते यांनी इतिवृत्ताच्या माध्यमातून दिले आहेत.

उपजिल्हाधिकाऱ्यांवर समन्वयाची जबाबदारी
किसान निधी योजनेच्या लाभार्थींचे लँड डेटा डिटेल्स अपलोडिंगसाठी आरडीसी नेटके यांनी तालुकानिहाय नेमले आहेत. यात रवींद्र परळीकर (जाफराबाद), गणेश निऱ्हाळी (बदनापूर), रिना बसैये (मंठा), अंजली कानडे (घनसावंगी), संदिपान सानप (जालना), अतुल चोरमारे (भोकरदन), स्वप्निल कापडणीस (अंबड), भ्ाऊसाहेब सानप (परतूर) यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...