आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे अभियंत्यांना दिले आदेश

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासाठी असलेली अंतर्गत जलवाहिनी होऊनही पाणीपुरवठ्याची सायकलिंग कमी झाली नाही. दरम्यान, ३१ मे रोजी ‘जलवाहिनीचे काम कागदोपत्री झाले पूर्ण; प्रत्यक्षात मात्र १०-१५ दिवसांआड येते पाणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

जालना शहराला जायकवाडी व घाणेवाडी (संत गाडगेबाबा जलाशय) या धरणांतून पाणीपुरवठा होत असतो. दरम्यान, साठवणूक क्षमता नसल्यामुळे जालनेकरांना चार ते सहा दिवसांआड पाणी मिळणे शक्य होत नाही, परंतु १३४ कोटी रुपयांतून अंतर्गत जलवाहिनी केलेली आहे. ही जलवाहिनी मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. सध्या कागदोपत्री ही योजना पूर्ण झाल्याची नोंद आहे. परंतु अजूनही जालनेकरांना उशिराने पाणी मिळत आहे.

याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी अंतर्गत जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेतला आहे. तसेच जालनामध्ये सुरळीत पाणीपुरवठा कसा करता येईल या अनुषंगाने खांडेकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच अंतर्गत जलवाहिनीचे राहिलेले कामे तत्काळ करण्याचेही आदेश दिले आहेत. पाण्याची कुठे गळती होणार नाही, जलाशयातून पाणी ओढताना त्या ठिकाणी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना करण्याचे आदेशही अभियंत्यांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...