आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन कार्यकारिणी जाहिर:अग्रवाल युवा समितीच्या राज्य सचिवपदी उद्योजक अग्रवाल

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अग्रवाल युवा समितीच्या राज्य सचिवपदी जालना येथील उद्योजक राहुल अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. धुळे येथील कार्यक्रमात ही निवड झाली. याच कार्यक्रमात त्यांनी पदभार स्वीकारला.धुळे येथे महाराष्ट्र राज्य युवा अग्रवाल संमेलनाच्या नूतन कार्यकारिणीचा शपथग्रहण समारंभ झाला. या कार्यक्रमात नवीन कार्यकारिणी, युवा पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष व राज्याच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी रमाकांत खेतान, विनोद अग्रवाल, कैलास अग्रवाल, किरणजी अग्रवाल, मालती अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्रवाल संमेलन युवा समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी धुळ्याचे अभिषेक अनिल अग्रवाल, तर जालना येथील उद्योजक राहुल किशोर अग्रवाल यांची सचिवपदी निवड करण्यात आली. याच वेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. या वेळी इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. राहुल किशोर अग्रवाल हे जालन्याचे युवा उद्योजक असून रूपम स्टीलचे संचालक आहेत.

बातम्या आणखी आहेत...