आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरीव निधी:उद्योजक घनश्याम गोयल यांचा सत्कार ; श्रीराम मंदिराची प्रतिकृती स्मृतचिन्ह दिले भेट

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजराती समाज, अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने जालना जिल्हा स्टील असोसिएशनचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय श्रीराम मंदिर ट्रस्टचे जालना जिल्हाध्यक्ष उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी प्रभू श्रीराम मंदिर बांधकामासाठी जालना जिल्ह्यातून भरीव निधी संकलन करून दिला. याबद्दल अखिल भारतीय वैष्णव वैरागी समाजातर्फे श्रीराम मंदिराची प्रतिकृती स्मृतचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, वीरेंद्र धोका, गौतमसिंग मनोत, रवींद्र बैरागी यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...