आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पंचवीस हजार मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; स्वच्छतादूत इंजि. अनया अग्रवाल यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला उपक्रम

जालना17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंसेवी संस्थांच्या वतीने राबविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन चळवळीत जालनेकरांनी यंदाही चांगला प्रतिसाद दिला. मोती तलाव येथे मध्यरात्रीपर्यंत २५ हजार घरगुती मूर्तींचे संकलन करून तेथे विसर्जन न करता अन्यत्र करण्यात आले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या, परिवर्तन ग्रुपच्या संस्थापक, महाराष्ट्र सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या सल्लागार तथा स्वच्छतादूत इंजि. अनया अग्रवाल यांनी रविवारी दिली.

मोती तलाव प्रदुषण मुक्त रहावा व पर्यावरण पुरक गणेश मूर्तींचे विसर्जन व्हायला हवे या साठी मागील दहा वर्षांपूर्वी पर्यावरण पूरक विसर्जन मोहीमेची मुहूर्तमेढ जालन्यात सर्वप्रथम इंजि.अनया अग्रवाल यांनी रोवली होती. विसर्जनामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी नगरपालिका, पोलीस प्रशासन, उद्योजक, अन्य स्वंयसेवी संस्था यांचा दरवर्षी समन्वय घडवून आणत आपण सुरू केलेली मोहीम आज लोकचळवळ झाली याबद्दल इंजि. अनया अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केले. शुक्रवारी सकाळी ८.३० वा.विसर्जनास प्रारंभ झाला. दुपारी पावसात ही मुर्ती संकलन सुरू होते हे विशेष पोलीस प्रशासनाने वाहतूक एका बाजूने करून तलावा भोवती लाकडी कठडे उभारले मोठ्या मंडळांसोबत आलेल्या घरगुती मुर्ती थेट मोती तलावात विसर्जीत न करता त्या संकलीत केल्या.या साठी मोती तलाव परिसरात कृत्रीम हौद उभारले.

शेवटी मोठ्या १० वाहनांतून घेऊन जात एका खदाणीत या मूर्तींचे पर्यावरण पुरक विसर्जन करण्यात आले. असे सांगून अनया अग्रवाल यांनी रात्री १२ वाजे पर्यंत एकूण पंचवीस हजार मुर्ती संकलीत करण्यात आल्या अशी माहिती अनया अग्रवाल यांनी दिली. या मोहिमेत डॉ. प्रतिभा श्रीपत, विद्या जाधव, संध्या जहागीरदार, सुवर्णा राऊत, ज्योती आडेकर,कविता नरवडे, सुनील कुऱ्हे , संजय देशपांडे, एस. एम. गॅस, परिवर्तन ग्रुप, सृष्टी फाऊंडेशन, रोटरी रेनबो,माहेश्वरी महिला संघटन, कालिंका स्टील, अजानी फाऊंडेशन यांनी मोलाचे योगदान दिले. या पुढे ही असेच सहकार्य दरवर्षी करावे असे आवाहन ही इंजि.अनया अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...