आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण जनजागृती:पर्यावरण जनजागृती, स्वच्छता सप्ताहातून परिसर स्वच्छता

जालना18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालन्यातील जेईएस महाविद्यालयात राष्ट्रीय ‌सेवा योजना विभागातर्फे पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह ७ ते १३ जून दरम्यान साजरा करण्यात आला.

जेईएस महाविद्यालय परिसर स्वच्छ करून सप्ताह चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेईएस शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज होते. या सप्ताहात राष्ट्रीय ‌सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी दुर्गा माता मंदिर परिसर, मामा चौक, बसस्थानक परिसर स्वच्छ केला, बसस्थानकातील प्रवासी व छोटे व्यावसायिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले.

या सप्ताहाचा समारोप १३ जून रोजी जेईएस महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाग्यश्री बियाणी या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज होते. व्यासपीठावर राष्ट्रीय ‌सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र सोनवणे आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा.भाग्यश्री बियाणी यांनी दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगून, पर्यावरणातील पशू-पक्षी मानवाचे मित्र असल्याचेही सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण व समाज सेवेच्या तासात स्वच्छतेचे महत्त्व शिकवले जाते, परन्तु आपण आचरणात आणत नाहीत. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे असेही डॉ बजाज यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. करण सातुरे यांनी तर उपस्थितांचे आभार मनिषा पोटे हिने मानले. या वेळी राष्ट्रीय ‌सेवा योजनेचे विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...